Friday, May 27, 2016

मधुकोष सोसायटी - रक्तदान शिबीर २०१६


"मधुकोष सोसायटी - रक्तदान शिबीर"


परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्

धुकोष सोसायटीने सुभाषीताला सार्थ ठरवत सामुहिक रक्तदानाच्या मालिकेतील दुसरे पुष्प यशस्वी रीतीने सोसायटी जनकल्याण रक्तपेढी, शुक्रवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले. रविवार दिनांक २२ मे २०१६ रोजी सर्व सोसायटीतील सदस्य सहकुटुंब येउन रक्तदान करून गेले, त्याच कार्यक्रमाचा हा मागोवा


शिबिराच्या कार्यक्रमाची सुरुवात हि अतिशय भावपूर्ण वातावरणात भारतमाता प्रतिमा पूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यावेळी सोसायटीमधील ज्येष्ठ सदस्य योग अभ्यासक आपटे आजी, डॉ. पुरंदरे, गोखले आजीश्री.काळवीट काकाश्री. भिडे, सोसायटीचे कार्यकारी सदस्य आदी उपस्थित होते
यानंतर लगेचच सोसायटीमधील डॉ. श्री. सुकृत पुरंदरे यांचे "Anemia - कारणे उपाय" या विषयावरील मार्गदर्शन झाले, डॉ. पुरंदरेंनी अतिशय साध्या सोप्या भाषेत केलेली उलगडणूक उपस्थितांना उपयुक्त ठरली


क्लब हाउस मधील सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी तशी १०-१५ दिवसांपासूनच सुरु झाली, - नियोजन बैठका, सोसायटीच्या आवारात, नोटीस बोर्डांवर जागृती करणारे फलक तसेच whatsapp, facebook सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदानाचे आवाहन करणारे पत्रक पसरवण्यात आले.
उत्साही वातावरणात सुरु झालेल्या शिबिरात्मध्ये नियोजनात तसेच रक्तदानात पुरुषांबरोबर स्त्रियादेखील हिरीरीने  सहभागी होत्या. सकाळी ०९:३० पासून साधारण दुपारी ०१:०० वाजेपर्यंत जवळपास ५१ जणांनी रक्तदान केले तर १२ जण काही कारणांमुळे रक्तदान करू शकले नाहीतया मध्ये महत्वाची आणि जाणवणारी गोष्ट अशी की रक्तदान करू शकणाऱ्यामध्ये महिलांचा आकडा हा हिमोग्लोबिन (Hb)  ची कमतरता, कमी वजन या कारणाने होता. धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, शरीराची झीज भरून निघेल अश्या खाण्याच्या सवयी जेवणामध्ये आग्रहाने वापर करण्यात याव्या अशे पदार्थ याबद्दल जनकल्याण तर्फे माहिती पत्रक देखील देण्यात आली. सुरुवातील झालेल्या "Anemia" वरील मार्गदर्शनाने पुढील वेळेस नक्कीच जास्तीत जास्त जण रक्तदान करतील अशी आशा

शिबिरात आलेल्या प्रत्येकाला स्वामी विवेकानंदांचे प्रबोधक विचार असणारे एक एक स्टीकर भेट म्हणून  पुढच्या रक्तदानाची आठवण म्हणून देण्यात आलेया वर्षीच्या शिबिरात अजून एक महत्वाची आकर्षक गोष्ट हि कि आलेल्या सर्वांचे BMI (Body Mass Index) तपासण्यात आले. रक्तपेढी तर्फे प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले.

शिबिराचा समारोप जनकल्याणचे श्री. संतोष अनगळ आणि श्री. दौलतराव यांच्या हस्ते सोसायटीचे सदस्य  (श्री भिडे, श्री जटार, सौ. बजाज, आपटे आजी, श्री. पठाडे इत्यादी) यांना प्रशस्तिपत्र व भावी कार्यक्रमांबद्दल चर्चा करून करण्यात आला.

सर्व हितचिंतकांचे आभार तसेच सोसायटी मध्ये अश्या प्रकारच्या सामाजीक जाणिवेचे दर्शन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन होईल असा विचार करणाऱ्या सर्वांचे आभार. धन्यवाद.

(खाली काही छायाचित्रे देत आहे)















Monday, February 15, 2016

दि, १५ फेब्रुवारी २०१६ च्या लोकसत्ता मधील अग्रलेख - 'अतिशहाणे वि. अर्धवट' यास उत्तर

दि, १५ फेब्रुवारी २०१६ च्या लोकसत्ता मधील अग्रलेख - 'अतिशहाणे वि. अर्धवट' यास उत्तर -

उत्तर -
. जर काश्मिरी तरुणांमध्ये अफजल जर का नायक असेल तर ते तरुण देखील तेवढेच देशद्रोही म्हणावयास हवे, केवळ काश्मिरी आहेत म्हणून नाही तर देशभरात कुठेही असे तरुण असतील तर ते देशद्रोहीच आहेत कारण देशाच्या महत्वाच्या तश्या संसदेवर त्याने केलेल्या हल्ल्याला हे समर्थनच समजावे
. फाशी दिली जात आहे हे घरच्यांना सांगायचे का नाही ह्याच्या वर जर विचार केला तर दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा, घरच्यांना माहित होते कि तो असे काही तरी करण्यात गुंतला आहे, त्यांनी वेळीच पोलिसांना सरकारला सावध करावयास हवे होते, जबाबदारी दोन्ही कडे असते. आतंकवाद संपवण्याची आणि तो तयार होऊ देऊ नये याची सुद्धा
. राजीव गांधी यांचे मारेकरी बंदिवानाच राहिले आणि १४ वर्षांनी अफजल ला फाशी दिली हे केवळ राजकारणाचे फळ आहे आणि याला जेवढे राजकारणी तेवढेच सुज्ञ (?) नागरिक पण जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मोठ्या प्रमाणात माध्यमे देखील जबाबदार आहेत कारण 'कशाला एखाद्या समाजाच्या वाकड्यात शिरा' हाच नेहमी दृष्टीकोन ठेवला जातो हे सर्वथा चुकीचे
. एखादा नागरिक आतंकवादी घोषित झाल्यावर त्याला 'हुतात्मा' म्हणणे जेवढे गैर तेवढेच ते छापून आणणे पण गैर आहे, अप्रत्यक्षरीत्या आपण दहशतवादी कारवायांचे समर्थनच करत आहोत
. आपण सार्वजण सर्जनशील नागरिक आहोत, त्यामुळे कुणाचीही शैक्षणिक पात्रता काढून पदाला मान देणे हेच उचित. त्या पदावर जी व्यक्ती आहे ती जर पदाला न्याय देऊ शाकत नसेल तर तसे चुका दाखवून सांगावे. नाही तर शैक्षणिक दृष्ट्या अपात्र ठरवले जाउन पण स्टीव जॉब्स, बिल गेट्स जन्माला आले आहेत. त्यामुळे ज्याने त्याने आपली आपली पायरी ओळखावी वागावे
. नथुराम ची कृती चूकच, त्याने गांधीजींचे राष्ट्रपती पण काही कमी होऊच शकत नाही. पण अफजलची कृती नथुराम ची कृती यातला फरक लक्षात घेत त्याचा संदर्भ इथे देणे हेच अविवेकी लक्षण म्हणावयास हवे. कुणाचे कृत्य निरपराध लोकांना, अविवेकी वृत्तींनी, समाजात तेढ निर्माण करणारे, मनामध्ये धार्मिक आकस ठेवून होते हा विचार करावयास हवा. केलेल्या कृत्याची जबाबदारी समर्थन करण्यास दाखवलेली नैतिक तयारी कुणाची होती ह्या गोष्टींचा विचार संर्वांनी करावयास हवा
. सर्वात शेवटी जे एन यु मधील घोषणा ऐका म्हणजे गांभीर्य लक्षात येईल तरी नाही आले तर दरवाजा ठोठावल्या जाण्याची वाट पहा